Home राजकारण बांगरांना मंत्रीपद मिळालं तर राज्यात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल! अंबादास दानवे

बांगरांना मंत्रीपद मिळालं तर राज्यात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल! अंबादास दानवे

210

३० जून वार्ता: शिवसेनाशिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना मंत्रीपद मिळालं तर महाराष्ट्रामध्ये मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल अशी खोचक टीका राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सध्याच्या सरकारइतकं अपयशी सरकार राज्यात कधीच राहीलं नाही. राज्यात भ्रष्टाचार सुरु आहे. शेतकऱ्यांचे कोणतंही काम होत नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. अतिवृष्टीची मदत देखील अद्याप झाली नाही. त्यामुळं हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारं सरकार असल्याचे हि दानवेंनी म्हटले आहे.