Home स्पोर्ट बबलू गावकर मित्रमंडळ यांच्यावतीने भव्य खुल्या ओव्हरआर्म ध्रुव चषक २०२६ या क्रिकेट...

बबलू गावकर मित्रमंडळ यांच्यावतीने भव्य खुल्या ओव्हरआर्म ध्रुव चषक २०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

114

सावंतवाडी प्रतिनिधी: ओटवणे गावठणवाडी येथील बबलू गावकर मित्रमंडळ यांच्यावतीने शुक्रवारी ३० जानेवारीपासुन ओटवणे ग्रामपंचायत नजिक भव्य खुल्या ओव्हरआर्म ध्रुव चषक २०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गोवा आणि महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडूंच्या क्रिकेटचा थरार क्रिकेट शौकीनांना पहायला मिळणार आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील प्रसिद्ध समालोचक मालवणीसह हिंदी व मराठीत समालोचन करणार आहे. लीग पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत निवडक १६ संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. या स्पर्धेत नामवंत खेळाडूंचा समावेश असून क्रिकेट रसिकांना चौकार व षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. ओटवणे सारख्या ग्रामीण गावातील क्रिकेटचा कुंभमेळा टेनिस क्रिकेट युट्यूबवर लाईव्ह पाहता येणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १,००००२ रुपये व ध्रुव चषक, द्वितीय पारितोषिक ५०,००२ रूपये व ध्रुव चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाना प्रत्येकी १५००० रूपयाचे पारितोषिक तसेच स्पर्धेतील मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज आदी वैयक्तिक पारितोषिके व चषक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघानी उदीत गांवकर ७८२०८१४३६५ आणि विशाल गांवकर ९४०४९३०२६० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिन गांवकर आणि आकाश मेस्त्री यांनी केले आहे.