Home स्टोरी बनावट दस्तऐवज बनवुन फसवणुक केल्याबाबत आरोपीस जामीन मंजुर.

बनावट दस्तऐवज बनवुन फसवणुक केल्याबाबत आरोपीस जामीन मंजुर.

173

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर गळवी रा. आंबेगाव ता सावंतवाडी यांने अक्षय सावंत, अरुण मिरांडा तसेच अन्य ३ ते ४ यांच्या विरुध्द त्यांची नोटरी येथे केसरी येथील जमीन मिळकत ज्ञानेश्वर यास विक्रित देतो असे सांगुन बनावट दस्तऐवज बनवुन २० लाख रुपयेची फसवणुक केली अशी भारतीय दंड संहिता कलम ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१ सह ३४ अन्वये दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदरकामी आरोपी क्र. १ यास पोलीसांनी लागोलाग पकडुन पोलीस रिमांड कस्टडी मागीतली होती सदरकामी आरोपी यांची पोलीस कस्टडी पुर्ण झाल्यानंतर आरोपी हा न्यायालयीन कोठडीत होता. त्यादरम्यान आरोपी चे विधिज्ञ यांनी मे. न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सदरकामी सरकार पक्ष व तपासीक अधिकारी यांचे म्हणणे मागविण्यात आले. व अर्जाची सुनावणी दिनांक १२ मार्च २०२४ रोजी घेण्यात आली होती. सदरकामी आरोपी यांचे विधिज्ञ अॅड. स्वप्नील बबन कोलगांवकर यांनी युक्तीवादा दरम्यान तक्रारदार यांने दाखल केलेल्या तक्रारीतील तफावत व तपासिक अधिकारी यांनी केलेला तपास यातील फरक काय आहे हे दाखवुन दिले. व सदरकामी आरोपी अक्षय सावंत हा कशाप्रकारे जामीन मिळण्यास पात्र आहे हि बाब निदर्शनास आणुन दिली. त्यामुळे आरोपी यांची मे. न्यायालयाने रक्कम रुपये ५०,०००/-च्या जामीनावर अटी व शर्ती सह जामीन मंजुर केलेला आहे. आरोपीच्यावतीने अॅड. स्वप्नील बबन कोलगांवकर यांनी कामकाज पाहीले.