Home क्राईम बदलापूर घटनेचा सावंतवाडीत निषेध.! तालुक्यातील खाजगी शाळेत मुलींच्या देखरेखीसाठी महिला नियुक्त करण्याची...

बदलापूर घटनेचा सावंतवाडीत निषेध.! तालुक्यातील खाजगी शाळेत मुलींच्या देखरेखीसाठी महिला नियुक्त करण्याची मागणी

79

सावंतवाडी: बदलापूर येथील आदर्श शाळेत अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध संबंधित युवकाला फाशी देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी तालुका पदाधिकारी यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांना दिले.

अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्या लहान मुलीवर अक्षय शिंदे नावाच्या २४ वर्षीय नराधमाने विकृतपणे लैंगिक अत्याचार केले. या नराधमाला भारतीय न्याय संहिते अंतर्गत फाशीची शिक्षा देण्यात यावी या सर्व घटनेला संबंधित नराधमाबरोबर त्या शाळेचे सर्व सुद्धा जबाबदार आहे. त्यांनी जर व्यवस्थित लक्ष दिले असते तर संबंधित घटना घडली नसती, या विरोधात संबंधित आरोपी तसेच सर्व व्यवस्थापन कर्मचारी हा सर्वस्वी जबाबदार आहे. या घटनेची इतर ठिकाणी पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने सावंतवाडी तालुक्यातील सर्व खाजगी शाळा अंतर्गत लहान मुलींसाठी त्यांच्या देखरेखी साठी महिला कर्मचारी नेमण्यात यावा, ही कार्यवाही येत्या सात दिवसात करण्यात यावी. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सर्व सावंतवाडी तालुका पदाधिकारी संबंधित घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. यावेळी सावंतवाडी पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशन,सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.