Home स्पोर्ट फ्लोरेट कॉलेज इंटेरियर फॅशन डिझायनिंग कणकवली येथे क्रीडा महोत्सव…!

फ्लोरेट कॉलेज इंटेरियर फॅशन डिझायनिंग कणकवली येथे क्रीडा महोत्सव…!

64

मसुरे प्रतिनिधी: फ्लोरेट कॉलेज इंटेरियर फॅशन डिझायनिंग कणकवली यांच्या इनडोअर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर पुरळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी किशोर कदम, मानसी चव्हाण, अक्षय येडवे, पराग आरोलकर, साक्षी खोपर्डेकर, ऋतुजा नेरुळकर, उपस्थित होते.

डॉक्टर पुरळकर म्हणाले, व्यक्तिमत्त्व घडण्यात खेळाचा मोठा वाटा असतो.संयम, सहनशीलता,जिद्द जिगर, चिकाटी, लढा ऊ पणा असे अनेक गुण विद्यार्थ्यांमध्ये खेळामुळे विकसित होतात. जिंकण्याची प्रेरणा पराभव पचवण्याची क्षमता,पराभवातून सावरून विजयाला गवसणी घालण्याची प्रेरणा निर्माण होते. शारीरिक भावनिक मानसिक विकासाचा खेळ हा पाया आहे. क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना शैक्षणिक उल्लेखनीय कामगिरी ची प्रशंसा केली. कॉलेज आणि विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला.फ्लोरेट कॉलेजने दिलेल्या संधीचा युवकानी लाभ घ्यावा व प्रत्येक खेळ खेळाडू वृत्तीने खेळावा असे आवाहन किशोर कदम यांनी केले. या सर्व क्रीडा प्रकारात सर्व विद्यार्थि, प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते. बुद्धिबळ स्पर्धेत विपुल राड्ये, आदित्य सावंत, हर्ष घाडीगांवकर, केतकी काकातकर, संदीप सुतार,  विघ्नेश माळकर

कॅरम स्पर्धक

सानिका राऊळ, श्रावणी परब, संतोषी डग्रे, वासंती मराठे, चैताली वडर, आदिती पंडित, तृप्ती भोगले, केतकी काकतकर, किरण मेस्त्री, सुवर्णा करमळकर, चिन्मयी सावंत, मिताली शिंदे, आदित्य सावंत ,नितीन मेस्त्री, संदीप सुतार ,विघ्नेश माळकर, इत्यादी विद्यार्थी कॅरम बुद्धिबळ खेळांमध्ये सहभागी झाले.