मसुरे प्रतिनिधी:
कोकणातील एकमेव नोकरी देणारे फॅशन व इंटेरियर डिझायनिंग कॉलेज फ्लोरेट कॉलेज कणकवली येथे खास नोकरदार वर्ग, महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी 3 महिन्यांच्या फॅशन डिझायनिंग बॅचचा स्वागत समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्पिता मुंबरकर उपस्थित होत्या. फॅशन फील्ड हे खूप मोठे आहे. ही कला कायमस्वरूपी रोजच्या जीवनात उपयोगात येतच राहते. शिवणकाम तसेच व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सर्व महिलांनी नक्की ह्या कोर्सचा फायदा घ्यावा असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. तसेच अनुभवी फॅकल्टी साक्षी खोपडकर व ऋतुजा नेरूरकर यांनी पूर्ण कोर्सच्या विषयांची माहिती महिलांना दिली. इलस्ट्रेशन , डिझायनिंग प्रोसेस, पॅटर्न मेकिंग, एम्ब्रोडरी, कुर्ता,सलवार,ब्लाऊज डिझायनिंग ह्या कोर्स मध्ये समाविष्ट आहे.3 महिन्यामध्ये ज्युनिअर फॅशन डिझायनर होण्याची संधीचा सर्वांनी अवश्य फायदा घ्यावा असे फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग कणकवली कॉलेज चे आवाहन आहे. सर्वांचे आभर अधिश्री तीवरेकर यांनी मानले