Home राजकारण फुकाचे श्रेय घेण्याच्या नादात निलेश राणेंकडून शेतकऱ्यांची दिशाभूल….! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी

फुकाचे श्रेय घेण्याच्या नादात निलेश राणेंकडून शेतकऱ्यांची दिशाभूल….! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी

395

सिंधुदुर्ग: गेले दोन दिवस प्रसारीत झालेल्या फुकटचे श्रेय मिळणार्‍या राजकीय नेते नीलेश राणे आणि कार्यकर्ते यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्‍यांची काळजी घेत असल्याचा आव आणत आंबा काजू फळपीक विमा योजनेची मूदत वाढली असल्याचे घोषित केले. प्रत्यक्षात विमा पोर्टल चालूच झाले नाही. जर चालू झाले तर विमा पोर्टल वर फॉर्म भरणारे शेतकरी सेवा केंद्रातून परतून जातानाचे चित्र जिल्ह्यात दिसले. जर पोर्टल वर फॉर्म भरण्याची मुदत संपली तर कुठून फॉर्म भरणार. गेला आठवडाभर पोर्टल सुरू नसल्यामुळे आमदार श्री वैभव नाईक यांनी कृषी मंत्री मुंडे यांना निवेदन देवून मुदत वाढ देण्यात यावी असे पत्र सर्वात आधी देण्यात आले होते.

मात्र ह्याचे श्रेय आमदार नाईक यांना जाईल म्हणुन निलेश राणे यांनी आपण जणू मुदत वाढवून दिली असे खोटे सांगून शेतकर्‍यांच्या भावनाशी व समस्या चे राजकारण करत शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळत आहेत. मात्र आज पर्यंत कोणत्याही प्रकारची मुदत वाढवून देण्यात आली नाही. मात्र हे प्रत्येक ठिकाणी फुकाचे श्रेय घेण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांनीच निलेश राणेंना गेम केला की काय? अशी दबक्या आवाजात चर्चा चालू मात्र ह्या सगळ्या भानगडीत शेतकर्‍यांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न मात्र निलेश राणेंकडून झाला आहे.