Home स्टोरी फिलिस्तीन आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धात महाराष्ट्राच्या धाडसी कन्येला वीरमरण ! इस्रायल...

फिलिस्तीन आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धात महाराष्ट्राच्या धाडसी कन्येला वीरमरण ! इस्रायल बॉर्डरवर होती तैनात

284

देश विदेश: फिलिस्तीन आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धात हमासच्या हल्ल्यात दोन भारतीय महिला सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एक महिला ही महाराष्ट्रातील असल्याचे सांगितले जात आहे. ७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यावेळी या दोन्ही महिला दक्षिणी इस्रायलमध्ये तैनात होत्या. इस्रायलमध्ये प्रत्येक नागरिकाला सैन्यात जावे लागते. पुरुषांसाठी ३६ महिने आणि महिलांसाठी २४ महिने ही सक्तीची सेवा आहे. इस्रायलचे नागरिकत्व घेतलेल्या परदेशी नागरिकांनाही ही सक्ती आहे. यामुळे भारतीय वंशाच्या या तरुणी देखील सैन्यात सहभागी झाल्या होत्या.

 

या दोन महिलांच्या वीरमरणाबाबत इस्रायल सैन्य आणि भारतीय समाजाने देखील पुष्टी केली आहे. यामध्ये २२ वर्षांची लेफ्टनंट ऑर मोझेस आणि इंस्पेक्टर किम डोक्राकर यांचा समावेश आहे. यापैकी डोक्राकर ही महाराष्ट्रीयन असल्याचे सांगितले जात आहे. किम डोक्राकर ही बॉर्डर पोलीस कार्यालयात तैनात होती. हमासच्या दहशतवाद्यांनी हे पोलिस ठाणे देखील लक्ष्य बनविले होते.