Home स्टोरी फिरती पुस्तक परिक्रमा बुक्स ऑन व्हील्स या उपक्रमाचे सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धा सावंत...

फिरती पुस्तक परिक्रमा बुक्स ऑन व्हील्स या उपक्रमाचे सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या हस्ते शुभारंभ.

98

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी मध्ये केंद्रीय शिक्षा मंत्रालय तर्फे लोकमान्य ट्रस्टच्या सहकार्याने २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत नॅशनल बुक ट्रस्ट ची पुस्तक परिक्रमा बस सावंतवाडी जगन्नाथराव भोसले उद्यान जवळ जवळपास ६५० पुस्तक संग्रह असलेली ही बस आहे. या पुस्तकांचे प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आव्हान सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी केले. सावंतवाडी केंद्रीय शिक्षा मंत्रालयातर्फे नॅशनल बुक ट्रस्ट फिरती पुस्तक परिक्रमा बुक्स ऑन व्हील मध्ये ६५० पुस्तक संग्रह आहे सावंतवाडीतील विद्यार्थी, नागरिकांनी पुस्तके पहावीत. असे आवाहन केले.

सावंतवाडी येथे केंद्रीय शिक्षा मंत्रालय तर्फे नॅशनल बुक ट्रस्ट फिरती पुस्तक परिक्रमा बुक्स ऑन व्हील्स लोकमान्य ट्रस्टच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले आठ दिवस ही फिरती पुस्तक प्रदर्शन ची बस सर्वत्र फिरत आहे. सावंतवाडीत काल २५ डिसेंबरला दाखल झाली. त्यानंतर आज २६ डिसेंबरला या उपक्रमाचे शुभारंभ सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी भाजपचे प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखम सावंत भोसले, भाजप शहर मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर.ळ, भाजपच्या महिला शहर मंडल अध्यक्ष नगरसेविका सौ मोहिनी मडगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक प्रतीक बांदेकर, नगरसेवक तौकीर शेख, नगरसेविका सुकन्या टोपले, नगरसेविका सुनीता पेडणेकर, नगरसेविका दुलारी रांगणेकर,  महिंद्रा अकॅडमीचे प्रमुख महेंद्र पेडणेकर, लोकमान्य एज्युकेशन ट्रस्टचे संचालक तथा तरुण भारत संवाद चे जिल्हा वितरण व्यवस्थापक सचिन मांजरेकर, व्यवस्थापक वामन राऊळ, कोकण मराठी साहित्य परिषदचे जिल्हा सचिव तथा तरुण भारतचे प्रतिनिधी ॲड संतोष सावंत, सचिन सावंत, अनुजा कुडतरकर, अमित कुमार मिश्रा, सुनील कुमार गजराज सिंग, जगत सिंग रावत, उमेश राठोड आधी उपस्थित होते.

यावेळी सौ सावंत पुढे म्हणाल्या केंद्रीय शिक्षा मंत्रालयातर्फे ही फिरती पुस्तक प्रदर्शन बस दिल्ली येथून आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मध्ये तीन दिवस ही बस पुस्तक प्रदर्शन फिरत्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सावंतवाडी सारख्या नगरीमध्ये असे फिरती पुस्तक प्रदर्शनीय बस चा लाभ सर्वांनी घ्यावा. आज शिक्षण व्यवस्था ही बदलली आहे. मोबाईलच्या काळात पुस्तक ज्ञान फार महत्त्व आहे. या फिरत्या व्हील पुस्तक परिक्रमा मध्ये लहान मुलांपासून ते युवकांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक असणारी पुस्तकांचे दालन येथे पाहायला मिळते. सावंतवाडी शहरात २४ तास उपलब्ध होईल आणि युवकांना तसेच जेष्ठ नागरिक यांना आवश्यक असणारी पुस्तके २४ तास उपलब्ध होतील तसेच संगणक युक्त अशी व्यवस्था उपलब्ध केली जाईल आणि त्यासाठी लवकरच अशी सर्व पुस्तके उपलब्ध असणारी लायब्ररी सुरू केली जाईल. गोवा येथे भव्य पुस्तक महोत्सव भरवला जात आहे. त्याचा लाभ ही सर्वांनी घ्यावा. असे ते म्हणाले.

यावेळी युवराज लखम सावंत भोसले यांनी लोकमान्य ट्रस्ट च्या माध्यमातून केंद्रीय शिक्षा मंत्रालयातर्फे नॅशनल बुक ट्रस्ट ची फिरती पुस्तक परिक्रमा आज सावंतवाडी त आपल्याला उपलब्ध झाली. याचा अधिकाधिक जणांनी लाभ घ्यावा. असे स्पष्ट केले यावेळी विद्यमान नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी सावंतवाडीतील जनतेने या पुस्तक परिक्रमाचा फायदा घ्यावा. खरंतर आज बदलत्या युगात पुस्तक वाचण्याची सवय कमी होत चालली आहे आणि अशा स्थितीत सर्व दर्जेदार पुस्तकांचे दालनच आपल्याला या फिरत्या बसच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. केंद्र सरकारचे आपण विशेष कौतुक करायला हवे. याचा लाभ विद्यार्थी महाविद्यालयान तसेच शालेय विद्यार्थी शिक्षक आणि घ्यावा. असे आव्हान त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन तरुण भारत संवादचे प्रतिनिधी ॲड संतोष सावंत यांनी केले. दिल्ली, आग्रा, कानपूर, नागपूर, अशीही फिरती पुस्तक प्रदर्शनीय बस थेट सिंधुदुर्गातून गोव्यात जाणार आहे. लोकमान्य ट्रस्टच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली कुडाळ वेंगुर्ले शिरोडा आणि आता सावंतवाडी मध्ये जवळपास ६५० पुस्तक संग्रह असणारी ही बस येथे उपलब्ध झाली आहे. गोवा येथे चार ते आठ जानेवारी या कालावधीत जागतिक दर्जाचे पुस्तक महोत्सव होणार आहे. त्याचीही जनजागृती आहे. मोबाईलच्या युगात पुस्तक हातात घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. अशा स्थितीत केंद्रीय शिक्षा मंत्रालयातर्फे नॅशनल बुक्स ट्रस्टची ही फिरती व्हील्स निश्चितच आजच्या तरुणांना पुन्हा एकदा पुस्तक वाचनाकडे वळवण्यास. मार्गदर्शक ठरत आहे. असे ते म्हणाले. यावेळी नॅशनल बुक ट्रस्टच्या माध्यमातून श्रद्धा सावंत भोसले यांना एक पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सावंतवाडी मध्ये ही बुक्स ऑन व्हील परिक्रमा रविवार २८ डिसेंबर पर्यंत जगन्नाथ भोसले उद्यान जवळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली असणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उपस्थितांचे आभार नगरसेवक प्रतीक बांदेकर यांनी मानले. यावेळी महिंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.