सिंधुदुर्गनगरी: वस्तू व सेवा कर कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या नावे जर कोणत्याही प्रकारची नोटीस तसेच आदेशाची प्रत प्राप्त झाल्यास सदर नोटीस अथवा आदेश यांची ऑनलाईन तसेच संबंधित कार्यालयात संपर्क करून प्रथम पडताळणी करून घ्यावी. त्यानंतरच आपले म्हणणे कार्यालयास योग्य मार्गाने सादर करावे, जेणेकरून आपली होणारी फसवणूक टाळता येऊ शकते, असे आवाहन वस्तू व सेवा कर कार्यालय ओरोस, सिंधुदुर्ग चे राज्यकर उपायुक्त संजय मोटकर यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यापा-यास अज्ञात इसमामार्फत मिळालेल्या GST बनावट आदेश प्रकरणाच्या अनुषंगाने हे आवाहन करण्यात येत आहे.