Home राजकारण फक्त आश्वासने नको बदल होओ….’ विकासासाठी विशालच हवो…! या घोषवाक्याने हजारोंच्या उपस्थितीत...

फक्त आश्वासने नको बदल होओ….’ विकासासाठी विशालच हवो…! या घोषवाक्याने हजारोंच्या उपस्थितीत विशाल परब भरणार उमेदवारी अर्ज.

105

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिन्ही तालुक्यात प्रत्येक गावागावात घराघरात जनतेच्या मनातील ताईत बनले ले भाजप युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब उआज द्या सोमवारी २८ ऑक्टोबरला भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आश्वासन नको बदल होओ..’ विकासासाठी विशाल झीलच होवो. हे घोषवाक्य घेऊन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब आज सोमवारी २८ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथून भव्य रॅलीने सावंतवाडी प्रांत कार्यालय येथे आपला निवडणूक साठीचा अर्ज दाखल करणार आहेत.

श्री परब हे आता निवडणूक रिंगणात उतरण्याच्या दृष्टीने पूर्ण ताकतीनिशी तयारीला लागले आहेत. उमेदवारी अर्ज सोमवारी २८ ऑक्टोबरला भरताना हजारो जनसमुदायांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत ते आपला अर्ज दाखल करणार आहेत. विशाल परब यांनी गावागावात कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधत सर्वांच्या आग्रहाखातर आपण आता उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आश्वासन नको बदल होवो, विकासासाठी विशालजीच होवो. हे घोषवाक्य घेऊन आपण रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब सावंतवाडी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार का? अशी चर्चा रंगली होती मात्र अखेर श्री परब आपला उमेदवारी अर्ज ते सोमवारी भरणार आहेत. महायुतीची उमेदवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना जाहीर झाली आहे. त्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आता युवा कार्यकर्ते विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणूक रिंगणात उभे राहावे अशी मागणी केली या मागणीला प्रतिसाद देत आपण आता जनतेच्या विकासासाठी निवडणूक रिंगणात राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फक्त आश्वासने नको. विकासासाठी विशालच हवा अशी आता सर्व स्तरातून आग्रह होत आहे. त्यासाठीच आपण आता सावंतवाडी विधानसभा निवडणुकी साठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तिन्ही तालुक्यातून गावागावातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य गोरगरीब जनता उपस्थित राहणार आहे.भव्य रॅलीने उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. श्री परब यांनी गेल्या सात आठ महिन्यापासून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अनेक उपक्रम राबवले आहेत. हे उपक्रम जनतेच्या हिताचे सामाजिक दृष्टिकोनातून राबवण्यात आले होते. गोशाळा त्याचबरोबर सहा मोफत ॲम्बुलन्स सुविधा ॲम्बुलन्स सुविधा उपक्रम कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने सावंतवाडी येथे उपस्थित जनसमुदाय हा आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम ठरला होता. त्यामुळे जनतेला विशाल परब हेच व्यक्तिमत्व आमच्या भागाचा विकास करू शकते असे सर्वांना वाटू लागले आहे आणि त्यामुळेच आपण सर्वांच्या आग्रहाखातर आणि इच्छेनुसार उमेदवारी अर्ज भरणार आहे.असे त्यांनी स्पष्ट केले. श्री परब हे उमेदवारी अर्ज भरणार असल्यामुळे गावागावातून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह व चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि जनतेच्या मनातला विकास व्हावा यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे त्यांनी सांगितले. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तरी मला आशीर्वाद देण्यासाठी तुमचा हक्काचा माणूस तुमच्या अडीअडचणला सुखदुःखात तुमच्या हक्काचा माणूस म्हणून मला साथ देण्यासाठी. मला सहकार्य करा आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन करण्यात आले आहे.