Home स्टोरी प्रीतगंध फाउंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद! मुख्याध्यापिका नेहा कदम यांचे प्रतिपादन

प्रीतगंध फाउंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद! मुख्याध्यापिका नेहा कदम यांचे प्रतिपादन

83

मसुरे प्रतिनिधी: विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन व अभिरुची निर्माण होण्यासाठी प्रीतगंध फाउंडेशन मुंबई चे उपक्रम नेहमीच कौतुकास्पद असतात असे प्रतिपादन मुख्याध्यापक नेहा कदम यांनी येथे केले.
प्रितगंध फाउंडेशन मुंबई दत्तक पालक योजने अंतर्गत पालकत्व 2023 हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा तिवरे वाळवेवाडी येथे संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रितगंध फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कवी संतोष माडेश्वर उर्फ डी यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम.सविता वाळवे, मुख्याध्यापक नेहा कदम, उपशिक्षक राजेंद्र कवडे ,माजी अध्यक्ष श्री.संतोष वाळवे,श्री किशोर देसाई, पदवीधर शिक्षक श्री.संदिप कदम, अंगणवाडी सेविका श्रीम.आंबेलकर, तसेच पालक अंजली वाळवे,श्रावणी कदम,मानसी वाळवे,आरती वाळवे,सुनिता वाळवे, शुभांगी वाळवे इत्यादी पालक उपस्थित होते, यावेळी पुढील मुलांना दत्तक योजनेचा लाभ देण्यात आला . 1-सुप्रिया संतोष तावडे, शहापूर -कु सोहम सुहास वाळवे , वाळवेवाडी इयता तिसरी,
2- सौ संगीता अमूंडकर,भांडुप-कु श्रुती श्रीधर कदम , वाळवेवाडी, इयत्ता -तिसरी,
3-राजेंद्र चौधरी -बोरिवली-कु वेदांत महेश वाळवे, वाळवेवाडी, इयत्ता -तिसरी,
4 साधना गंटी,खारघर-कु विघ्नेश चंद्रकांत वाळवे, वाळवेवाडी इयत्ता -तिसरी,
5-श्री. धिरज मारुती नारकर, बेलापूर-कु रोहन महेश वाळवे , वाळवेवाडी इयत्ता -चौथी.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका नेहा कदम यांनी केले तर आभार राजेंद्र कवडे यांनी मानले.