Home स्टोरी प्रा. सतीश बागवे यांना मराठा समाज गौरव पुरस्कार प्रदान..!

प्रा. सतीश बागवे यांना मराठा समाज गौरव पुरस्कार प्रदान..!

150

सावंतवाडी: येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणारे, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडीचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांना नुकताच सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई यांच्यावतीने, ‘मराठा समाज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते देण्यात आला. प्रा. सतीश बागवे सर हे सावंतवाडी येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक असून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने केलेल्या विशेष सेवा कार्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी डाॅ. अजित राणे (केनिया), श्री. सुशील वारंग, विश्वस्त शशिकांत गावडे, व्ही. बी. नाईक सर, दिवाकर दळवी आदींचा देखील गौरव करण्यात आला. प्रा. सतीश बागवे यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.