मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांच्या नियमित वेतन श्रेणी बाबतकोणतीही सकारात्मक कार्यवाही प्रशासनाकडून होत नसल्याने १२ जून २०२३ रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते ५ या वेळेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतची नोटीस सर्व संबंधितांना देण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांच्या नियमित वेतन श्रेणीबाबत उपमुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी जि.प. सिंधुदुर्ग यांच्याशी निवेदन देऊन वेळोवेळी चर्चा करूनही सदर प्रश्नांबाबत कोणतीही सकारात्मक कार्यवाही प्रशासनाकडून केलेली नाही. सदर प्रश्नाबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे. अशी आमची धारणा झालेली असून या बाबत संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी याबाबत आपले लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक १२/६/२०२३ रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते ५ या वेळेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.