Home स्टोरी प्रसिद्ध भजनी बुवा कोकण संगीत रत्न वीशाल मसुरकर यांचा मसुरेत हृदय सत्कार

प्रसिद्ध भजनी बुवा कोकण संगीत रत्न वीशाल मसुरकर यांचा मसुरेत हृदय सत्कार

406

मसुरे प्रतिनिधी:

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदिवडे गावचे सुपुत्र, भजन रत्न, संगीत भजनाचे बादशहा सुप्रसिद्ध बुवा विशाल मसुरकर यांनी मंगळवार २२ सप्टेंबर रोजी मसुरे बाजारपेठ येथे मेघश्याम पेडणेकर परिवाराच्या निवासास्थानी श्री गणराया चरणी भजन रुपी सेवा सादर केली. अतिशय सुंदर पद्धतीने सादर केलेल्या संगीत भजनाचा आस्वाद मसुरे ग्रामस्थांनी घेतला. भजनरूपी सेवेनंतर बुवा विशाल मसुरकर यांनी आजवर राज्यात विविध भजन स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाची बक्षिसे प्राप्त करून या भूमीचे नाव उज्वल केले आहे. संगीत क्षेत्रात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव देश भर पोचवले आहे.त्याच्या या कार्याचा गौरव म्हणून विशाल आणि त्यांच्या भजन मंडळाचा पेडणेकर परिवाराच्या वतीने श्री साईंची प्रतिमा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन बुवा विशाल मसुरकर यांचा हृदय सत्कार करण्यात आला.

यावेळी दगडु सावंत, मेगश्याम पेडणेकर, मनीष अमरे, दीपक पेडणेकर, मनीष घाडीगावकर, झुंजार पेडणेकर, लक्ष्मी पेडणेकर, प्राजक्ता पेडणेकर,ललित परब,ज्योती पेडणेकर, शैलेश मसुरकर, वैभवी पेडणेकर, अमित मोरे, मानसी पेडणेकर, मनस्वी पेडणेकर,श्री गोसावी, निधी पेडणेकर, मिहिर मसुरकर, वृषभ मसुरकर आदी उपस्थित होते..