Home स्टोरी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या!

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या!

331

२ ऑगस्ट वार्ता: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या या निधनामुळे मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नितीन देसाई हे प्रसिद्ध कला दिग्दर्शक तर होतेच, पण त्यासोबतच ते अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकदेखील होते. आता त्यांच्या निधनामुळे सोशल मीडियाद्वारे नेटकरी शोक व्यक्त करत आहेत.