Home स्टोरी प्रसिद्ध एल आय सी विमा सल्लागार संगीता नार्वेकर हिचे निधन.

प्रसिद्ध एल आय सी विमा सल्लागार संगीता नार्वेकर हिचे निधन.

268

मसुरे प्रतिनिधी:

 

मसुरे सय्यद जुवा येथील रहिवासी आणि एलआयसी मालवण येथील प्रसिद्ध विमा सल्लागार सामाजिक कार्यकर्ते संगीता गणपत नार्वेकर वय 47 हीचे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले गुरुवारी दुपारी साडेअकरा वाजता बांदिवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते येथील व्यापाऱ्यांनी रिक्षा व्यवसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून संगीता हिला श्रद्धांजली वाहिली. संगीताच्या निधनाने मसुरे बांदिवडे गावावरती शोककळा पसरली आहे.

संगीता नार्वेकर ही मालवण तालुक्यामध्ये एलआयसी विमा सल्लागार म्हणून सर्वांना परिचित होती. एलआयसी कंपनीच्या वतीने संगीता हिला अनेक पुरस्कार मिळाले होते. नुकताच तिला सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल मानवता विकास परिषदचा राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. गावातील अनेक संस्थांमध्ये ती कार्यरत होती.

मसुरे, बांदिवडे गावातील सामाजिक क्षेत्रामध्ये संगीता हिचे योगदान फार मोठे होते. तसेच कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेळोवेळी सर्वांना तिने मदत केली होती. आर पी बागवे हायस्कूलच्या सांस्कृतिक कमिटीची ती सदस्या होती. गावातील अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना तिने वेळोवेळी शैक्षणिक मदत केली. गावातील धार्मिक कार्यक्रमात तिचा सहभाग मोठा असायचा. कट्टा येथील थोर संत राणे महाराज यांची ती निःसीम सेविका होती. गरीब गरजू कुटुंबांना एलआयसीच्या माध्यमातून तिने अनेक वेळा मोठ्या मदती मिळवून दिल्या होत्या. मालवण तालुक्यामध्ये सर्वांशी तिचे चांगले संबंध होते. सर्वांशी ती मिळून मिसळून वागत असायची. तिच्या पश्चात आई, भाऊ, भावजय असा मोठा परिवार असून मालवण येथील प्रसिद्ध अशा पारिजात हॉटेलचे मालक शाम आणि सुंदर युवा सामाजिक कार्यकर्ते संजय आणि शंकर तसेच त्या काळातील प्रसिद्ध युवक काँग्रेस नेते कै.राजू नार्वेकर यांची ती बहिण होतं.