मसुरे प्रतिनिधी:
काळसे व कुंभारमाठ ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रमोद रतन निकम याना सन २०२१-२२ साठी मालवण तालुक्यातून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार ओरोस येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला.
शासनाने ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडवण्यास सर्वतोपरी सहाय्य करण्याऱ्या ग्रामसेवक यांना प्रोत्साहित करुन त्यांचा गौरव करण्यासाठी शासन निकषानुसार 2 ऑक्टोबर या गांधी जयंती दिनी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शासनाने विहीत केलेल्या शर्तीच्या शिफारशीनुसार व शासन निकषानुसार सन 2021-22 या वर्षाकरिता आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्रमोद निकम यांची निवड करण्यात आली आहे. निकम हे गेली सतरा वर्ष मालवण तालिक्यातील तारकर्ली, तळगाव आदी विविध गावात ग्रामसेवक म्हणून काम पाहत आहेत. शरद कृषी भवन सिंधुदुर्ग येथे पुरस्कार प्रदान करताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,
आ निरंजन डावखरे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, राजू राऊळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, दादा साईल, गटविकास अधिकारी मालवण आप्पासाहेब गुजर, बीडीओ जयप्रकाश परब, वासुदेव नाईक, विजय चव्हाण, वासुदेव नाईक, अरुण चव्हाण यांच्यासह असंख्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.