Home स्टोरी प्रभाग ९ आय अंतर्गत विध्नहर्ता सोसायटीत बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम!लेखी तक्रारी नंतरही अनधिकृत...

प्रभाग ९ आय अंतर्गत विध्नहर्ता सोसायटीत बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम!लेखी तक्रारी नंतरही अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष!

116

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – अनधिकृत बांधकामाच्या कर्दनकाळ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या प्रभाग ९ आयच्या सहाय्यक आयुक्त सौ हेमा मुंबरकर यांच्या कार्यक्षेत्रातील विध्नहर्ता सोसायटीत बेकायदेशीर रित्या अनधिकृतपणे बांधकाम होत आहे . या बांधकामाची दोन वेळा लेखी तक्रार करून ही सदरचे बांधकाम पुर्णत्वात येत असल्याने तक्रारदाराकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे .प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या विध्नहर्ता अपार्टमेंट या नोंदणीकृत गृह संकुलाच्या तळ मजल्यावरील रूम नं . ०० ४ मध्ये सौ .अक्षदा अशोक गायकवाड या आपल्या पतीसह सन २०१८ सालापासुन रहात आहेत . यांच्या घरा समोरच सदर सोसायटीने या गायकवाड कुटूंबीयांना कसल्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता ६ बाय ६ लांबी रुंदी व सुमारे ४ फुट उंचीचा एक कट्टा बांधण्याचे काम सुरु केले आहे . या कट्टया मुळे या कुटूंबाला घरा समोरील जागेचा वापर करण्यासाठी भविष्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात यावे म्हणून सौ . अक्षदा गायकवाड यांनी दि . २८ मार्च २०२३ रोजी कल्याण डोंबिवली महापालिकेच्यानगर रचना विभागाकडे तसेच प्रभाग ९ आय कार्यालयाकडे लेखी स्वरूपात पुराव्यासह तक्रार केली होती .या तक्रार अर्जानंतर सुरु असलेले काम पालिका स्तरावर निष्कासित न करता फक्त थांबविण्यात आले होते .परंतु थांबविण्यात आलेले काम हे २० एप्रिल पासुन पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

हे काम पुन्हा नव्या जोमाने सुरु झाल्याचीही लेखी तक्रार सौ. अक्षता गायकवाड यांनी प्रभाग ९ आय च्या सहाय्यक आयुक्त सौ हेमा मुंबरकर यांचे कडे केली असून पुढील दोन दिवसात कार्यालयाला सुट्टी असल्याने हे अनधिकृत बांधकाम पूर्ण होणार असल्याची शक्यता असतांनाही या अनधिकृत बांधकामावर प्रभाग ९ आय कार्यालयाकडून निष्कासनाची कारवाई केली जात नाही. या प्रकारामुळे आपल्या कुटुंबीयांवर होणाऱ्या या अनधिकृत बांधकामा बाबत आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न या तक्रारदार गायकवाड कुटुंबियांना पडला आहे.