Home स्टोरी प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या विघ्नहर्ता गृह संकुलातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात संपूर्ण...

प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या विघ्नहर्ता गृह संकुलातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात संपूर्ण इमारतीच्याच वैद्यतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होण्याची शक्यता!

47

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या विघ्नहर्ता गृह संकुलाच्या वाहन तळावर अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार केलेल्या तक्रारदाराच्या दारा समोरच पुन्हा नवीन अनधिकृत भिंत उभी करून तक्रारदार महिलेचा आवाज दाबण्याचा सोसायटी + विकासक + प्रशासन या त्रिकुटा कडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. याच प्रयत्नातून इमारतीच्या विकासकाने तक्रारदाराला त्रास देण्याच्या हेतूने सुडबुद्धी पोटीहल्लीच बांधण्यात आलेल्या नवीन अनधिकृत भिंतीला रंगरंगोटी करून ही भिंत जुनीच असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या भिंतीमुळे संपूर्ण इमारतीच्या वैद्यतेबाबत या नवीन अनधिकृत भिंतीने प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे !संबंधीत विकासकाने ग्रामपंचायत काळात म्हणजे सन २००६ साली पिसवली ग्रामपंचायतीकडून सदर इमारत बांधण्याची परवानगी घेतल्याचे प्राप्त माहिती वरून दिसत आहे. पिसवली

ग्रामपंचायतीच्या या परवानगी मधील अटी /शर्थी मधील पहिल्याच क्रमांकाच्या अटी मध्ये स्पष्ट पणे नमुद केले आहे की, परवागी मिळाल्या पासुन एक वर्षाच्या आत इमारतीचे काम सुरु करणे बंधनकारक आहे. परंतु इमारतीचे बांधकाम पिसवली ग्रामपंचायतीचा महापालिका क्षेत्रात समावेश झाल्यानंतर आणि बांधकाम परवानगी मिळाल्या नंतर तब्बल ८ वर्षा नंतर म्हणजेच सन २०१५ साली सुरु करण्यात येवून २०१७ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. २०१७ पासुन आज पर्यंत अस्तित्वातच नसलेली भिंत आता तक्रारदाराच्या दारासमोर अनधिकृतपणे बांधून तीची रंगरंगोटी करण्यात येवून तक्रारीचा सुड उगवला जात आहे. याच एका भिंती मुळे भविष्यात संपूर्ण इमारतीच्याच वैद्यतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. या इमारत बांधकामाची अधिकृतता महापालिका आयुक्त कोणत्या निकषावर तपासून पहाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी या प्रकरणाची येत्या ५ जुन २०१३ रोजी पालिका आयुक्त यांच्या दालनात होणाऱ्या लोकशाही दिनातील सुनावणीच्या निर्णयापर्यंत थांबणे क्रमप्ताप्त आहे.