Home स्पोर्ट प्रभाग स्तरीय समूह नृत्य स्पर्धेत लहान गटात सावंतवाडी केंद्र प्रथम…!

प्रभाग स्तरीय समूह नृत्य स्पर्धेत लहान गटात सावंतवाडी केंद्र प्रथम…!

318

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा करणार सावंतवाडी केंद्राचे तालुकास्तरीय स्पर्धेचे नेतृत्व.

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवांतर्गत प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा जिमखाना मैदान सावंतवाडी व सांस्कृतिक स्पर्धा आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे पार पडल्या.यामध्ये सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेने सावंतवाडी केंद्राचे प्रतिनिधित्व करत लहान गटात समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.तसेच विविध खेळात घवघवीत यश संपादन केले.

लहान गटात मुलांमध्ये लांब उडी या क्रीडा प्रकारात तन्मय अमित कांबळे (तृतीय क्रमांक) व मुलींमध्ये संस्कृती शैलेश सरमळकर (तृतीय क्रमांक), लहान गट मुली सांघिक क्रीडा प्रकारात रिले(५०×४)- द्वितीय क्रमांक व खो-खो मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.

या मिळविलेल्या यशाबद्दल सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कमलाकर ठाकूर सर, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शैलेश पई, उपाध्यक्ष श्री मोहन वाडकर, सचिव श्री डॉ. प्रसाद नार्वेकर व संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे पालक, शिक्षणप्रेमी यांनी यश प्राप्त मुलांसह शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, शाळेचे शिक्षक यांचे अभिनंदन केले.तसेच समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना तालुका स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यश प्राप्त विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक श्री धोंडी वरक, श्री अमित कांबळे, श्रीम ज्योत्स्ना गुंजाळ, श्रीम प्राची बिले, श्रीम स्वरा राऊळ, श्रीम. संजना आडेलकर, श्रीम. स्मिता घाडीगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.