Home स्टोरी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी व कोकण संस्थेकडून नवजात बालकांना भेटवस्तूंचे...

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी व कोकण संस्थेकडून नवजात बालकांना भेटवस्तूंचे वितरण.

51

सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण संस्था यांचा अनोखा उपक्रम प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामधील 15 नवजात बालकांना भेटवस्तू देऊन हॉस्पिटल मधील उपस्थितांना जलेबीचे वाटप केले. या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्या रूपा मुद्राळे, समीरा खलील व हेलन निब्रे यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी रवी जाधव व लक्ष्मण कदम तसेच राणे सिस्टर व गोसावी सिस्टर उपस्थित होत्या सामाजिक बांधिलकीच्या या अनोख्या उपक्रमाचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी कौतुक केले.