Home स्टोरी प्रकाश आंबेडकर यांना अटक करण्याची मागणी!

प्रकाश आंबेडकर यांना अटक करण्याची मागणी!

152

१८ जून वार्ता: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल शनिवार दि. १७ जून रोजी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी प्रकाश आंबेडकर यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

आनंद दवे (संग्रहित छायाचित्र )
औरंगजेबाच्या कबरीला प्रकाश आंबेडकर यांची भेट

छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या आणि संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर डोक टेकून प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील लाखो शिवभक्तांना दुखावलं आहे. नव्हे त्यांनी शिवभक्तांच्या शिवभक्तीला आव्हानच दिलं आहे. राज्यातील वातावरण बिघडण्याआधी, शिवभक्त चिडण्याआधीच सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावर कडक कलम लावून त्यांना अटक सुद्धा करावी अशी आमची भावना आहे. असं हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवण्याचं पाप केलं! खासदार उन्मेश पाटील

खासदार उन्मेश पाटील(संग्रहित छायाचित्र )

भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. आज प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवण्याचं पाप केलं. हा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. कारण हा प्रश्न जात धर्म पक्षाच्या पलीकडे आहे, ज्या औरंगजेबाने आपल्याच भावाचा खून केला. हिंदू- माता भगिनींवर अत्याचार केले. अशा अनाचारी, दुराचारी, अत्याचारी औरंगजेबाचे दर्शन घेऊन तुम्ही महाराष्ट्राला फसवण्याचं काम करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दांत भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.