Home क्राईम पोलीस ठाण्यात बाँबस्फोट घडवल्याचा खोटा व्हिडिओ प्रसारित करणार्‍या ५ मुसलमानांना अटक !

पोलीस ठाण्यात बाँबस्फोट घडवल्याचा खोटा व्हिडिओ प्रसारित करणार्‍या ५ मुसलमानांना अटक !

142

मलप्पुरम् : पोलीस ठाण्यात बाँबस्फोट घडवल्याचा खोटा व्हिडिओ प्रसारित करणार्‍या ५ मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. महंमद रियाझ, महंमद फवाज, महंमद जैसमीन, सलीम आणि सलामनुल फारिश अशी अटक करणार्‍यांची नावे आहेत. या व्हिडिओमध्ये काही मुसलमान तरुण ‘आपण कुठे बाँबस्फोट करू शकतो ?’, याविषयी चर्चा करतांना दिसत आहेत. या चर्चेत सहभागी झालेला एक तरुण रेल्वेस्थानकात बाँबस्फोट घडवण्याची सूचना करत आहे, तर अन्य मुसलमान तरुण ‘पोलीस ठाण्यात बाँबस्फोट करूया’, असे सांगत आहे. त्यांच्या या संभाषणानंतर केरळमधील एका पोलीस ठाण्याच्या इमारतीत बाँबस्फोट होतांना दिसत आहे. ‘सामाजिक माध्यमांवर अधिक प्रमाणात लोकांनी या व्हिडिओला ‘लाईक’ करावे, यासाठी हा व्हिडिओ बनवला’, असे या तरुणांनी सांगितले.