Home स्टोरी पोलीस अधीक्षकांनी घेतली हॉटेल व लॉज मालकांची बैठक

पोलीस अधीक्षकांनी घेतली हॉटेल व लॉज मालकांची बैठक

157

सिंधुदुर्ग:- लोकसभा निवडणुक शांततेत पार पडावी, कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.हॉटेल मध्ये मुक्‍कामाकरीता येणाऱ्या पर्यटकांचे ओळखपत्र घेवुन त्याची विहीत नमुन्‍यातील रजिस्‍टरमध्‍ये नोंद करून ते जतन करावे.हॉटेल तसेच रुम मध्‍ये अंमलीपदार्थ सेवन करणाऱ्यांची माहिती तत्‍काळ पोलीस विभागास कळवावी तसेच कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिले .

 

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक शांततेत आणि निर्भयपणे पार पडावी या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हयातील हॉटेल आणि लॉज मालकांची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली. यावेळी हॉटेल व लॉजेस मालकांशी चर्चा करुन त्‍यांना येणा-या अडचणीबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले.

 

श्री अग्रवाल म्हणाले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आणि अग्‍नीशमन यंत्रणा सुरळीत ठेवावी.परदेशी नागरीक वास्तव्यास असताना त्यांच्याकडून विहीत नमुन्‍यातील अर्ज भरुन ते संबंधित पोलीस ठाण्यास सादर करावा. या सर्व सुचनांचे पालन करीत असतांना विनाकारण पर्यटकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही ते म्हणाले. या बैठकिस कृषिकेश रावले, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, सचिन हुंदळेकर, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा यांचेसह सिंधुदुर्ग जिल्‍हयातील हॉटेल/लॉज चालक मालक समितीचे सदस्य उपस्थित होते.