Home स्टोरी पोलादपुर तहसिल कार्यालयातच कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

पोलादपुर तहसिल कार्यालयातच कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

112

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: आज १ मे महाराष्ट्र दिनी रायगड येथील तहसिल कार्यालयात एका कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलादपुर तहसिल कार्यालयात ही घटना घडली आहे. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव राजेंद्र केकान (वय वर्ष ३०) असे आहे. राजेंद्र मुळचे बीड येथील रहिवाशी होते. पोलादपुर तहसिल कार्यालयाच्या मुख्य लोखंडी दरवाजाला त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. तहसिल कार्यालयातच त्यांनी आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.