सिंधुदुर्ग: – दापोली येथून बोरीवली येथे जाणार्या लक्झरी बसमधील प्रवाशांना पेण तालुक्यातील कोपर फाटा येथे मारहाण करत त्यांच्याकडून १५ तोळे सोने लुटल्याची घटना १२ मार्चला उत्तररात्री ३ वाजता घडली आहे. कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेससमोर वरील घटना घडली असून स्विफ्ट, स्कोडा आणि अर्टिका या ३ गाड्यांमधून आलेल्या अनुमाने ३० ते ३५ जणांच्या टोळीने लक्झरी बसवर दगडफेक करत बसमधील प्रवाशांना मारहाणही केली आहे.प्रवाशांपैकी एका महिलेने याविषयी सांगितले की, संबंधित टोळीने लक्झरी बस थांबवून बसवर दगडफेक केली आणि प्रवाशांनाही मारहाण केली आहे. माझ्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन, पतीच्या गळ्यातील चेन आदी दागिने हिसकावून नेले.