Home स्टोरी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सकल हिंदु समाज रस्‍त्‍यावर!

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ सकल हिंदु समाज रस्‍त्‍यावर!

126

२ ऑगस्ट वार्ता: काँग्रेस पक्ष आणि डाव्‍या विचारसरणीच्‍या लोकांकडून ऋषितुल्‍य पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍यावर अश्‍लाघ्‍य आणि शिवराळ भाषेत टीका केली जात आहे. रिझर्व्‍ह बँकेचे माजी गव्‍हर्नर घोष यांनी लिहिलेल्‍या ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्‍तकाचा संदर्भ देत गुरुजींनी केलेल्‍या वक्‍तव्‍यावर हे वादंग निर्माण केले गेले आहे.

मुठभर लोकच गुरुजींच्‍या विरोधात असून सकल हिंदु समाज गुरुजींच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभा आहे, हे दर्शवण्‍यासाठी सकल हिंदु समाजाच्‍या वतीने येथील शिवतीर्थावर (पोवई नाक्‍यावर) पू. गुरुजींच्‍या समर्थनार्थ आंदोलन करण्‍यात आले. या प्रसंगी शेकडो हिंदूंच्‍या उपस्‍थितीत पू. गुरुजींच्‍या प्रतिमेला दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला. नंतर जिल्‍हा प्रशासनाला निषेध निवेदन देण्‍यात आले.या प्रसंगी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ, हिंदु एकता आंदोलन, हिंदु जनजागृती समिती यांच्‍यासह विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि धारकरी शेकडोंच्‍या संख्‍येने उपस्‍थित होते.