Home स्टोरी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रिया भिकाजी मेस्त्री...

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रिया भिकाजी मेस्त्री व यश सावंत प्रथम.

36

कुडाळ प्रतिनिधी: पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ व सावंतवाडी संस्थान मराठा समाज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने कुडाळ मराठा समाज मंडळाच्या हॉलमध्ये पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या 88 व्या पुण्यतिथी निमित्तआयोजित प्रथमच जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात रिया भिकाजी मेस्त्री व लहान गटात यश प्रविण सावंत यांचा प्रथम क्रमांक आला. विजेत्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

पुण्यश्लोक पंचम खेम सावंत उर्फ बापूसाहेब महाराजांचा जीवन पट व कार्य व इतिहास सर्वसामान्यापर्यंत पोहचावे यासाठी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक यश प्रवीण सावंत, द्वितीय क्रमांक हंसिका जगन्नाथ वजराटकर, तृतीय क्रमांक निधी सचिन सोनवडेकर यांचा आला तर खुल्या गटात प्रथम क्रमांक दिया भिकाजी मेस्त्री, द्वितीय क्रमांक प्राजक्ता परशुराम मोरजकर, तृतीय क्रमांक युक्ता प्रसाद सापळे यांचा आला. या स्पर्धेत. शालेय व खुल्या गटात स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आतापर्यंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या वर आधारित असे जिल्ह्यात प्रथमच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र कुडाळ येथील शाळां मधून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.. सावंतवाडी मालवण आदी भागातून स्पर्धकांनी सहभाग दर्शवला. दरवर्षी स्पर्धा घेण्याचे अध्यक्ष श्री एडवोकेट सुहास सावंत यांनी स्पष्ट केले.

  या स्पर्धेच्या उदघाट्न व बक्षीस वितरण कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष ऍड सुहास सावंत, सावंतवाडी संस्थान मराठा समाज सावंतवाडी चे समिती प्रमुख रामचंद्र परब, समिती समन्वयक नंदू गावडे, भगिनी मंडळ सदस्य व माजी अध्यक्षा अदिती सावंत, स्वाती सावंत, श्रीमती काजरेकर , अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग चे सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड, दुर्गसंशोधन व इतिहास संशोधन विंग जिल्हाध्यक्ष गणेश नाईक, शैलेश घोगळे, योगेश काळप उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून इंदू डगरे व गणेश नाईक यांनी काम पाहिले. . कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी.ॲड. संतोष सावंत यांनी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज त्यांच्या एकंदरीत सामाजिक कार्याविषयी भूमिका स्पष्ट केली तर जिल्हाध्यक्ष अडवोकेट सुहास सावंत यांनी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या रामराज्य बाबत आजच्या पिढीला आपल्या महाराजांबाबतचे इतिहासाची जाण पिढीला व्हावी या दृष्टीने ही स्पर्धा घेण्यात आली आहे या स्पर्धेतून आमचे राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांची प्रेरणा बहुजन समाज घेईल हा हेतू आहे. परीक्षक साहित्यिक हिंदू डगरे यांनी वकृत्व स्पर्धेत वेळेचे भान आणि हवा तसेच स्पर्धकांनी एखादा विषय मांडणी कशी करावी याबाबत विवेचन केले तर आतापर्यंत वकृत्व स्पर्धा होतात पण श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या विषयी प्रथमच वकृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यामुळे हा विषय वेगळा असल्यामुळे बाल मुलांनी तो उत्तम मानला अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.. सूत्रसंचालन विनय गायकवाड यांनी तर आभार गणेश नाईक यांनी मानले.