Home स्पोर्ट पुणे शहर काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा सेलच्या वतीने इंटर दो जो...

पुणे शहर काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा सेलच्या वतीने इंटर दो जो कराटे स्पर्धा संपन्न.

135

पुणे: रविवार दिनांक १४ जुलै २०२४ रोजी पुणे शहर काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा सेलच्या वतीने इंटर दो जो कराटे स्पर्धा काँग्रेस भवन सभागृह येथे पार पडल्या. याप्रसंगी उदघाटन मान.श्री.अजितदादा दरेकर मा. नगरसेवक, यांचे शुभ हस्ते मशाल प्रज्वलित करून झाले.तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.अभय छाजेड, सरचिटणीस म. प्र. कॉ. क ,मा. विजय शिंदे मा.अध्यक्ष शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका, मा. सौरभ अमराळे अध्यक्ष पुणे शहर युवक कॉंग्रेस, संतोष पाटोले पार्वती ब्लॉक अध्यक्ष् ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी मान. अजितदादा दरेकर म्हणाले की, सर्व क्षेत्रात सर्वश्रेष्ठ क्षेत्र म्हणजे क्रीडा क्षेत्र आहे यात कोणताही धर्म,जात,नसते. यात सर्वांना समसमान मानले जाते तसेच आई,वडील आणि गुरू यांचा जो मुलगा, मुलगी मान – सन्मान राखतो त्यांना कधीच काही कमी पडत नाही. म्हणून कला, क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक कधीही कसलाही भेदभाव करत नाही. सर्वांना समसमान स्व: सौरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे ते पवित्र कार्य करत असतात. तसेच मान. आमदार रविंद्र धंगेकर यांनीही या कराटे स्पर्धेत भेट देऊन “कराटे ही कला आजच्या काळात सर्वांनीच आत्मसात केली पाहिजे” ज्यामुळे आपण आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो. यासाठी प्रशिक्षण नियमितपणे घेतले पाहिजे. त्यातील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन प्रावीण्य मिळविले पाहिजे. यामुळे नावलौकिक प्राप्त होते. तसेच निरोगी, सुदृढ आरोग्यासाठी निर्व्यसनी राहून नियमित व्यायाम केला पाहिजे. ज्यामुळे प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढतो. असे स्पर्धेतील सहभागी विद्यार्थींना आवर्जून सांगितले.

यास्पर्धेत काँग्रेस भवन, शिवाजीनगर, न.ता. वाडी, नांदेड सिटी, भू गाव, प्रो – एक्षण अकॅडमी, पुणे, स्वाधार संघटना बुधवार पेठ,सोमवार पेठ, बावधान, शवणे, नवी सांगवी, या प्रशिक्षण वर्गांतून सुमारे १७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नांदेड सिटी, द्वितीय क्रमांक शिवाजी नगर व तृतीय क्रमांक काँग्रेस भवन शाखेने मिळवला.

या स्पर्धेचे आयोजन पुणे शहर काँग्रेस कमिटी युवक व क्रीडा सेल अध्यक्ष – मा.आशुतोष शिंदे आणि बॉउंडलेस स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे व सर्व सहकारी प्रशिक्षक सहकार्याने यशस्वीपणे करण्यात केले.