Home क्राईम पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…!

पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…!

204

पुणे: पुणे शहरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पती -पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत मुलीने आरोपी असलेल्या पती-पत्नीक़डून मुलीच्या वडिलांनी आजारपणासाठी ३० हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, त्यांना पैसे परत करता आले नाहीत. या कारणामुळे आरोपी पती पत्नीने आघोरी प्रकार केला. त्याआरोपींनी मुलीला जबरदस्तीने पळवून नेत तिला के.के.मार्केट येथील एका लॉजमध्ये १० दिवस डांबून ठेवलं. त्यानंतर आरोपीने मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा सगळा प्रकार आरोपीच्या पत्नीला माहिती असूनसुद्धा मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ‘माझे पैसे दे, नाही दिले तर कुठूनही वसूल करुन दे, तुला सोडणार नाही’ अशी दमदाटी केली. त्यानंतर मात्र या आरोपीने पिडीत मुलीला लॉजवर राहायला येणाऱ्या ग्राहकाकडून पैसे घेवून वेश्याव्यवसाय करायला भाग पाडला. लॉजमध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाला त्याने विचारणा केली आणि ज्यांनी होकार दिला त्यांच्याकडून पैसे घेत थेट मुलीच्या खोलीत पाठवून अत्याचार करायला सांगितला. संबंधित आरोपी पती – पत्नीवर भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.