Home स्टोरी पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीच्या चार जणांचा देवगड समुद्रात बुडून मृत्यू….!

पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीच्या चार जणांचा देवगड समुद्रात बुडून मृत्यू….!

122

देवगड: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पर्यटनासाठी पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड येथे आली असताना देवगड समुद्रात आनंद लुण्यासाठी हे सर्व उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडाले.यातील एकला वाचविण्यात यश आले आहे तर एक जण बेपत्ता असून चार जणांचा मृत्यू झाला आहे ही घटना शनिवारी दुपारी 3.30 वा सुमारास घडली.

 

पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल सिंधुदुर्ग पर्यटनासाठी शुक्रवारी प्रथम मालवण येथे आली. शनिवारी सकाळी कुणकेश्वर करून दुपारी देवगड पवनचक्की येथे ही सहल आली. या सहली मध्ये एक शिक्षक व विद्यार्थी असे एकूण 35 जण होतेजेवण झाल्यानंतर पवनचक्की येथुन यातील काही विद्यार्थी देवगड बीच येथे दुपारी 3.30 वा सुमारास उतरले. यातील आकाश तुपे, प्रेरणा डोंगरे, अनिषा पवळ, आंकिता गालटे, पायल बनसोडे, राम डीचोलकर हे विद्यार्थी समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले हे पाहताच किनाऱ्यावर असणाऱ्या सहकाऱ्यांनी ओरड मारली.

 

यावेळी जीवरक्षक आणि स्थानिक युवक, ग्रामस्थ यांनी धावाधाव केली व पाण्यात उतरून त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र यातील आकाश तुपे याला वाचविण्यात यश आले तर राम डीचोलकर हा बेपत्ता असून उर्वरित चार जणांना बाहेर काढण्यात यश आले मात्र चारही जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी तहसीलदार आर. जे. पवार, पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, नगराध्यक्ष साक्षी प्रभू  तसेच पोलीस कर्मचारी.न. प कर्मचारी दाखल झाले. यातील बेपत्ता डीचोलकर याचा शोघ सायंकाळीं उशिरा पर्यंत सुरू होता.