१४ जुलै वार्ता: यावर्षी देशभरात मान्सून उशिरा सुरू झाला आहे. मान्सून उशिरा सुरू झाला पण देशभरात काही ठिकाणी आता मान्सून जोरात सुरू आहे. उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्लीमध्ये यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. लाल किल्ल्यामध्ये पाणी शिरले आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरुच आहे. गेल्या दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात पडत आहे. आता मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. राज्यातील पुढील चार-पाच दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रा राज्यात सर्वच जिल्ह्यांत पुढील चार, पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. गेले काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाचा पाऊस जोर वाढला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.