Home स्टोरी पुढची रामनवमी रामलल्लाच्या मंदिरात ! पंतप्रधान मोदी

पुढची रामनवमी रामलल्लाच्या मंदिरात ! पंतप्रधान मोदी

143

२४ ऑक्टोबर वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विजयादशमी च्या सणा सहभागी झाले. यावेळी त्यांनी दिल्लीतील द्वारका रामलीला मैदानावर रामलीला पाहिली. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेलाही संबोधित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,

मी सर्व भारतीयांना शक्तीपूजनाच्या नवरात्रीच्या सणाच्या आणि विजयादशमीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. विजयादशमीचा हा सण अन्यायावर न्यायाचा, अहंकारावर नम्रतेचा आणि क्रोधावर संयमाचा विजय करणारा सण आहे. चंद्रावर विजय मिळवून २ महिने पूर्ण होत असताना यावेळी आपण विजयादशमी साजरी करत आहोत. विजयादशमीला शस्त्रांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. भारतीय भूमीवर शस्त्रांची पूजा कोणत्याही भूमीवर वर्चस्व गाजवण्यासाठी नाही, तर तिचे रक्षण करण्यासाठी केली जाते. विजयादशमीचा सण केवळ रामाच्या रावणावर मिळावलेल्या विजयाचा सण नसून राष्ट्राच्या प्रत्येक दुष्कृत्यावर देशभक्तीच्या विजयाचा सण आहे. आपण समाजातील दुष्कृत्ये आणि भेदभाव नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे.भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात विश्वासार्ह लोकशाही म्हणून उदयास येत आहे. प्रभू राम जन्मभूमीवर उभारले जाणारे मंदिर हे शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर मिळाले आहे. यामुळे ते भारतीयांच्या संयमाच्या विजयाचे प्रतीक आहे. आज आपण भाग्यवान आहोत की आपण भगवान रामाचे सर्वात भव्य मंदिर बांधताना पाहत आहोत. पुढील रामनवमीला अयोध्येच्या रामललाच्या मंदिरात गुंजणारा प्रत्येक जयघोष हा संपूर्ण जगाला आनंद देईल. मंदिरात प्रभू राम विराजमान होण्यासाठी अवघे काही महिने उरले आहेत.

 

विजयादशमीचा सण केवळ रामाच्या रावणावर मिळावलेल्या विजयाचा सण नसून राष्ट्राच्या प्रत्येक दुष्कृत्यावर देशभक्तीच्या विजयाचा सण