Home स्टोरी पी एम किसान प्रलंबित लाभार्थ्यांसाठी मालवण तालुक्यात विशेष मोहीम!

पी एम किसान प्रलंबित लाभार्थ्यांसाठी मालवण तालुक्यात विशेष मोहीम!

151

२० व २१ जून रोजी गाव पातळीवर आयोजन ; तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांची माहिती.

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत चौदाव्या हप्त्याच्या लाभ वितरणाची कार्यवाही सध्या सुरू आहे.केंद्र शासनाने योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्याने ई-केवायसी (e-kyc) ,बँक खाते आधार संलग्न करणे व Land seeding करणे या बाबी अनिवार्य केलेले आहेत. प्रलंबित लाभार्थींचे ई-केवायसी, बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी दिनांक २० जून व २१ जून रोजी मालवण तालुक्यात गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी दिली आहे.

मालवण तालुक्यातील पी एम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी, बँक खात्याला आधार संलग्न व Land seeding केली असल्याची खात्री करून घ्यावी. लाभार्थ्यांना ई- केवायसी सोबतच बँक खात्याला आधार संलग्न करणे तसेच भूमि अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावत करणे (land seeding) या तिन्ही बाबी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. अन्यथा केंद्र शासनाच्या पीएम किसान तसेच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्माननिधी योजना या दोन्ही योजनेच्या एकत्रित वार्षिक रुपये 12000 लाभापासून लाभार्थी वंचित राहू शकतो. ही केवायसी पर्यायासमोर नो असल्यास लाभार्थ्यांनाही केवायसी करण्यासाठी केंद्र शासनाच्या PM kisan Gol App द्वारे चेहऱ्याचा फोटो काढून ई-केवायसी करणे सुलभ झालेले आहे. Land seeding पर्याय समोर No असल्यास तलाठी किंवा तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधून Land seeding करून घ्यावी. बँक खात्याला आधार संलग्न केलेली नसल्यास बँकेत जाऊन बँक खात्याशी आधार संलग्न करून घ्यावे किंवा पोस्ट मास्तर यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडावे.मालवण तालुक्यातील पी एम किसान योजनेच्या सर्व लाभार्थींना आवाहन करण्यात येते की दिनांक २० व २१ जून रोजी खालील प्रमाणे नमूद गावामध्ये कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी तसेच पोस्ट खात्याचे कर्मचारी उपस्थित राहून प्रलंबित ई-केवायसीची पूर्तता करण्यात येणार आहे. तरी प्रलंबित लाभार्थीने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून उचित कार्यवाही करून घ्यावी.

खात्याला आधार संलग्न करणे आणि Land seeding केली असल्याचे खात्री करून घ्यावी. दिनांक 20 जून रोजी सकाळी ठीक ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खालील प्रमाणे ग्रामपंचायत निहाय नियोजन करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत सुकळवाड, पेंडूर, धामापूर, गुरमवाडी, मालोंड, चुनवरे, रामगड, गोठणे, बुधवळे-कुडोपी, श्रावण, कांदळगाव, महान, शिरवंडे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, चाफेखोल, कणकवळे, पोईप, हिवाळे, कोळंब, सर्जेकोट, आडवली याप्रमाणे तरदिनांक २१ जून रोजी सकाळी ठीक ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ग्रामपंचायत – तळगाव पराड-खरारे, चौके, नांदरुख, नांदोस, मसदे, वडाचापाट, निरोम त्रिंबक, श्रावण-भटवाडी चिंदर, किर्लोस-आमवणे, घुमडे, कातवड, साळेल आमडोस, माळगाव, हेदुळ, वांयगणी, पळसंब याप्रमाणे नियोजन आहे. याकरिता गाव पातळीवरील कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी व पोस्ट कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत तरी पी एम किसान (PM kisan) प्रलंबित लाभार्थानी आपली ई-केवायसी व संबंधित आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री विश्वनाथ गोसावी यांनी केलेले आहे.