आजरा: ३० मे वार्ता: पिंपळगाव चे सुपुत्र आणि देवर्डे गावचा नातू इंडियन आर्मी ऑफिसर कु शुभम शंकर शेवाळे यांची वयाच्या २२ व्या वर्षी लेफ्टनंट पदी निवड झाली आहे.

शिपाई कु शुभम शंकर शेवाळे याने काहीतरी उतुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारावर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने ते साध्य करणारे असे रॉयल बटालियन मराठा लाइफ इन्फ्ट्रीमध्ये सुभेदार मेजर श्री शंकर शेवाळे यांचे सुपुत्र शिपाई कु. शुभम शंकर शेवाळे यांनी इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत प्राथमिक शिक्षण पिंपळगाव ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथे मराठी माध्यम मध्ये शिक्षण घेऊन इयत्ता ६ वी मध्ये सातारा सैनिक स्कुल मध्ये खुप परिश्रम घेऊन ६ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढील बी एस सी चे शिक्षण गडहिग्लज मध्ये घेत असताना आपले आर्मी ऑफिसर बनण्याचे स्वप्न पूर्ण करणेसाठी मराठा लाईफ इन्फन्ट्री मध्ये जनरलं ड्युटी मध्ये भरती झाला. आणि आपले मराठा सेंटर चे ट्रेनिंग पूर्ण करून रॉयल बटालियन मणिपूर येथे युनिट मध्ये आपले कर्त्यव पार करत असताना देश सेवा करत असताना आपले आर्मी मध्ये ऑफिसर बनण्याची जिद्द आणि रॉयल बटालियन चा झेंडा उंचावर नेण्याचा सतत प्रयत्न करुन रॉयल बटालियनचे टायगर कर्नल विक्रम वसंत नलावडे व सुभेदार मेजर शंकर शेवाळे यांच्या मार्गदर्शना खाली ACC EXAM मध्ये उत्तीर्ण होऊन इंडियन आर्मी ऑफिसर लेफ्टनंट बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. या बद्दल रॉयल बटालियन आयोध्या व पिंपळगाव देवर्डे ग्रामस्थांच्या वतिने तसेच सर्व स्थरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणि अभिनंदन होत आहे.