Home क्राईम पिंगुळीत दोन ठिकाणी अवैध दारू धंद्यांवर छापे! २ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल...

पिंगुळीत दोन ठिकाणी अवैध दारू धंद्यांवर छापे! २ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त..

333

कुडाळ, बांदा पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांची बेधडक कारवाई…..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी:

 

पिंगुळी नवीवाडी येथे कुडाळ व बांदा पोलीसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २ लाख ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उत्तम अशोक गावडे ४० व संदीप चंद्रशेखर गावडे ३९ रा दोन्ही पिंगुळी नवीवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. तर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत पिंगुळी पिंगुळी मोरजकरवाडी येथे छापा टाकून ३० हजार १०० रूपयाची दारू जप्त करत एकाला ताब्यात घेतले आहे.दोन्ही कारवाईत २ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कुडाळ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पिंगुळी नवीवाडी येथील उत्तम अशोक गावडे  व संदीप चंद्रशेखर गावडे यांच्या घराच्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी घराच्या मागील पडवीत जाऊन पाहिले असता त्याठिकाणी दारूचे बॉक्स आढळले. याबाबत दोन्ही संशयितांना विचारले असता ही दारू आपण विक्री साठी आणली असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या जवळ दारू विक्रीबाबतचा कोणताही परवाना मिळाला नाही. यातील दोघेही एकाच घरात वेगवेगळे दारू विक्री करत आहेत. यानुसार उत्तम प्रकाश गावडे यांच्या जवळ १ लाख ५२ हजाराचा दारू साठा मिळाला. या प्रकरणी चंद्रशेखर शंकर मुणगेकर बांदा पोलीस यांनी कुडाळ पोलीसात फिर्याद दाखल केली. तर संदीप चंद्रशेखर गावडे यांच्या ताब्यात १ लाख १३,८३१ रूपयांची दारू मिळाली. या प्रकरणी फिर्याद कृष्णा शंकर परूळेकर कुडाळ पोलिस यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. या कारवाईत कुडाळ पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला, पोलीस हवालदार कृष्णा परूळेकर प्रितम कदम, रूपेश सारंग, अमित बांदेकर यांनी सहभाग घेतला होता. या दोघांवर गैरकायदा बिगरपरवाना दारू बाळगल्याप्रकरणी कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंगुळीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारू साठा मिळाला असून याबाबत पिंगुळी परिसरात चर्चा सुरू आहे. तर पिंगुळी – मोरजकरवाडी येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने एका घराच्या बाजूला छापा टाकून ३० हजार १०० रुपयाची गोवा बनावटीची दारू जप्त केली.यात तुषार रमेश मोरजकर ( 32 , रां.पिंगुळी – मोरजकरवाडी) याला ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पिंगुळी – मोरजकरवाडी येथे मुबई गोवा महामार्गा नजीक एका टपरीवर गोवा बनावटीची दारू विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला गोपनीय मिळाली. त्यानुसार आज सायंकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे व लक्ष्मण साळुखे,हवालदार रूपाली खानोलकर , बस्त्याव डिसोजा आदींच्या पथकाने छापा टाकला. तेथील एका टपरीच्या ठिकाणी या पथकाला काही सापडले नाही.त्यामुळे तेथील काही अंतरावर असलेल्या तुषार मोरजकर याच्या घराकडे छापा टाकला.त्या घराच्या बाजूला गोवा बनावटीची दारू सापडली.यात होडका , व्हड्स व अन्य दारूने भरलेले दोन खोके व 133 दारूने भरलेल्या बाटल्या पथकाने जप्त केले केल्या.तसेच सशयित तुषार मोरजकर याला ताब्यात घेतले. याप्रकरणी तुषार याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच त्याला 41(१) नोटीस बजावून समज देण्यात आली. तपास हवालदार के. एम.परुळेकर करीत आहेत.