Home स्टोरी पावणाई देवी मंदिर धाकोरा येथे ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

पावणाई देवी मंदिर धाकोरा येथे ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

128

सावंतवाडी: तालुक्यातील धाकोरा येथे काल रविवार दिनांक २२ रोजी सायंकाळी नवरात्र उत्सवानिमित्त श्री पावणाई देवी मंदिर धाकोरा येथे खास महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा‘ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न झाला. सुप्रसिद्ध निवेदक आणि व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी हास्य, मनोरंजन आणि ज्ञानासोबत ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम घेऊन चांगलीच रंगत आणली. या कार्यक्रमाचे आयोजन श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट धाकोरे आणि धाकोरे ग्रामस्थ यांनी केले.

‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात सर्व फेर्‍यांमध्ये उत्तम प्रदर्शन करीत प्रथम विजेत्या रिया रवींद्र मुळीक, द्वितीय अदिती अजित परब, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या जागृती जयवंत मुळीक या ठरल्या. या सर्वांसाठी पहिली पैठणी कै. शुभदा बाळकृष्ण मुळीक यांच्या स्मरणार्थ वंदना सागर तावडे देवगड यांच्याकडून, दुसरी पैठणी कै. सुप्रिया विजयकुमार मुळीक यांच्या स्मरणार्थ विजयकुमार दत्ताराम मुळीक यांच्याकडून तर तिसरी पैठणी गुरुदत्त अंकुश गवस यांच्यातर्फे बक्षीस म्हणून देण्यात आल्या. शिवाय  खेळामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ आणि धाकोरा संरपच स्नेहा निलेश मुळीक यांच्याकडून भेट वस्तू देण्यात आली. तसेच हा कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

यावेळी श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट धाकोरे अध्यक्ष सागर मुळीक, उपाध्यक्ष विठ्ठल मुळीक, सेक्रेटरी सुनील मुळीक, खजिनदार निलेश मुळीक, उपखजिनदार प्रसाद मुळीक, बंडया मुळीक, अमित मुळीक, सचिन मुळीक, दिगंबर मुळीक, संदेश मुळीक, योगराज मुळीक, मयुर मुळीक, संचित मुळीक, ओमभाई बाळकृष्ण मुळीक, भाई मुळीक, बबलू मुळीक, विनायक मुळीक, सूरज  मुळीक, रोहन गवस, सुनील मुळीक, संजय मुळीक, ग्रामपंचायत सदस्य भारती मुळीक, निवृत्त शिक्षक बाळकृष्ण मुळीक, माजी सैनिक दत्ताराम मुळीक, पोलीस मॅडम श्रावणी सचिन मुळीक, माजी उपसरपंच विठ्ठल मुळीक, माजी सरपंच गणेश मुळीक, माजी ग्रामपंचायत सदस्य देसाई मॅडम, सरिता मुळीक आणि मंडळाचे पदाधिकारी व धाकोरे ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. शेवटी सरपंच स्नेहा निलेश मुळीक यांनी उपस्थित सर्व मान्यवर, महिला तसेच ग्रामस्थांचे आभार मानले.