Home स्टोरी पाळणेकोंड धरण नुतन जलशुध्दीकरण प्रकल्प लोकार्पणाच्या प्रतिक्षेत!

पाळणेकोंड धरण नुतन जलशुध्दीकरण प्रकल्प लोकार्पणाच्या प्रतिक्षेत!

189

सावंतवाडी: – शहारवासियांना पाळणेकोंड धरण पायथ्याशी असणाऱ्या जलशुध्दीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. हा पाणी पुरवठा २४ तास व्हावा असे जनतेच स्वप्न आहे. विद्यमान शासनाने हे जनतेचे स्वप्न साफल्य होण्यासाठी अतिरीक्त जलशुध्दीकरणाच्या पुर्नबांधणीसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तांत्रिक मार्गदर्शनाखाली जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यात आलेले आहे. पाणी शुध्दीकरणाची जैविक चाचणीचे प्रात्यक्षिकही पुर्ण झाले आहे. प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न करावा २४ तास पाणी देवून जनतेचे स्वप्न साफल्य करावे अशी शहरवासियांची मागणी आहे.