Home स्टोरी पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर!

पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर!

82

१९ जून वार्ता: कोयना धरणातील पाण्याची पातळी सध्या खालावलेली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी येथील चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली असून येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्याची वीजनिर्मितीही बंद होण्याच्या मार्गावर आहे.धरणाची जलसाठवण क्षमता १०५ टी.एम्.सी. असून सध्या धरणामध्ये केवळ ११.७४ टी.एम्.सी. एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.