Home शिक्षण पाडलोस ग्रामस्थ संघ मुंबई यांच्या वतीने आर्या गावडे हिचा सत्कार.

पाडलोस ग्रामस्थ संघ मुंबई यांच्या वतीने आर्या गावडे हिचा सत्कार.

216

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बाल कलाक्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२५ सावंतवाडी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोस नंबर 1ची विधार्थिनी आर्या सुनील गावडे ही ५० मिटर धावणे प्रकारात सावंतवाडी तालुक्यातून प्रथम आली व जिल्हा स्तर व निवड झाली. पाडलोस गावातील आर्या ही पहिलीच विध्यार्थिनी आहे जिची जिल्हा स्तरावर निवड झाली. ही गावासाठी अभिमानाची गोष्ट असल्याने मुबंई ग्रामस्थ संघटनेचे अध्यक्ष नारायण परब, उपाध्यक्ष दिगंबर नाईक, सचिव अर्जुन गावडे, सहसचिव जयेश माधव, रवींद्र गावडे, खाजिनदार तुकाराम गावडे यांच्या वतीने गाव उपसमिती चे पदाधिकारी कृष्णा करमळकर, गोपाळ करमळकर, नकुल गावडे, चंद्रकांत नाईक यांच्या हस्ते आर्याचा रोख रुपये ५००० हजार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच दीप्ती दिलीप गावडे व रश्मी राणे यांनी सुद्धा आर्याला पारितोषिक देऊन सन्मानीत केले. जिल्हा स्तरासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी व्यासपिठावर सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजेश शेटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, पोलीस पाटील रश्मी माधव, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, कृषिविद्यालय प्राचार्य समीर कोलते, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशाताई व पालक, पाडलोस ग्रामस्थ संघ उपसमिती पदाधिकारी व ग्रामस्थ बहूसख्येने उपस्थित होते. उपस्थितीतांचे स्वागत मुख्याध्यापक विजय गावडे यांनी केले तर आभार शिक्षक अनिल वरक यांनी केले.