Home क्राईम पाकिस्तानात हिंदू तरुणीवर सामूहिक बलात्कार.

पाकिस्तानात हिंदू तरुणीवर सामूहिक बलात्कार.

168

पाकिस्तान: पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका महिन्यात तीन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले असून, एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तसेच एका हिंदू मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कोट गुलाम मोहम्मद मीरपूर खास येथे ही घटना घडली. जिथे कोहली समाजातील हिंदू मुलीवर पंजाबी सात मुस्लिम तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करणार्‍या तरुणांची संख्या सात होती. ज्यापैकी पीडित तरुणी चौघांना ओळखते. सात तरुणांपैकी चार भुगरी, मेहबूब आणि दोन पंजाबी तरुण आहेत.

पीडित तरुणीने सांगितले की, आरोपी तरुणाने 30 सप्टेंबर रोजी तिचे घरातून अपहरण केले होते. यानंतर ते तिला सोबत घेऊन गेले आणि धमकी देऊन सात तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. घरी पोहोचल्यानंतर तिने घरच्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही किंवा एफआयआरही नोंदवला नाही.