Home स्टोरी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या गिताने अजरामर झालेले स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या...

‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या गिताने अजरामर झालेले स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकासाठी फक्त २५ लाखांचा निधी मंजूर!

220

‘गटार आणि पाय वाटा बनविण्यासाठी मंजुर होणाऱ्या निधी एवढाच निधी मंजूर करून केली स्मरसम्राटाची महापालिकेने केली थट्टा !

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – ‘ पाऊले चालती, पंढरीची वाट ‘, ‘ चल गं सखे चल गं सखे पंढरीला! या गितांपासून ते थेट सत्य नारायणाच्या पूजे पर्यंत ज्या स्वरसम्राटाने कल्याण करांची ओखळ संपूर्ण भारताला करुन दिली आहे असे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाच्या नुतनिकरणासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने २५ लाख रुपयांचा विशेष निधी मजुर केला आहे. चाळीतील गटार आणि पाय वाटा बनविण्यासाठी मंजूर होणाऱ्या निधी इतपतच समरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकासाठी निधी मंजुर केला असल्याने माजी महापौर रमेश जाधव यांचेसह प्रल्हाद शिंदे यांच्या अनेक चाहत्यांनी या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने २०१० साली प्रल्हाद शिंदे यांचे स्मारक कल्याण पश्चिमेतील गोळीवली येथे निर्माण केले आहे. परंतु या स्मारकाची काही महिन्यातच दुरावस्था झाली आहे, या स्मारकाचे नुतनीकरण करण्यात यावे या साठी माजी महापौर रमेश जाधव हे सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर महापालिकेने या स्मारकाच्या नुतनी करणासाठी २५ लाखांचा निधी मंजूर करून या कामाचा कार्यादेशही काढला आहे. परंतु इतक्या मोठ्या महान गायकाच्या स्मारकाच्या नुतनीकरणासाठी २५ लाखांचा निधी मंजूर करुन पालिकेने या स्वरसम्राटाची थट्टाच केल्याची भावना माजी महापौर रमेश जाधव यांनी व्यक्त केली आहे. सामान्य पणे गटार आणि पाय वाटा साठी मंजूर होणार्‍या निधी समानच प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. महापालिका स्मार्ट सिटीच्या नावाखाली छोट्या छोट्या कामाला, वाहतुक बेटांना २० ते २५ लाखांचा निधी सहज मंजूर करीत आहे. परंतु प्रल्हाद शिंदे यांच्या भव्य स्मारकासाठी पालिकेकडे निधी उपलब्द नसावा हे खेद जनक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या मंजुरी निधी बाबत प्रल्हाद शिंदे यांचे जेष्ठ चिरंजिव महागायक आनंद शिंदे यांचेशी संपर्क साधला असता ‘पालिका २५ लाखात काय काय करणार आहे ते पहावे लागेल, असे त्यांनी सांगितले, तर कल्याण पूर्वेतच प्रल्हाद शिंदे यांचे भव्य स्मारक व्हावे अशी कल्याण पूर्वेतील जनतेची भावना आहे अशी प्रतिक्रीया समाजसेवक सुबोध भारत यांनी दिली.