Home राजकारण पहाटेचा शपथविधीच्या गौप्यस्फोटावरून देवेंद्र फडणवीसांवर संजय राऊतांची टीका….

पहाटेचा शपथविधीच्या गौप्यस्फोटावरून देवेंद्र फडणवीसांवर संजय राऊतांची टीका….

105

शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाला. असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘फडणवीस असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं करतील, असं वाटलं नव्हतं,’ असे शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान फडणवीसांच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.नेमकं काय म्हणाले संजय राऊत?….देवेंद्र फडणवीसांना काहीच माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबाबतचे रहस्य बाहेर येण्यास वेळ लागेल. असे राऊत म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?….फडणवीसांनी केलेले विधान काही गौप्यस्फोट नाही. गौप्यस्फोटापेक्षा त्याला फेकाफेक म्हटले जाते. ही फेकाफेक आहे. अचानक फेकाफेकीला महाराष्ट्रात का उत आलेला आहे? महाराष्ट्रात त्यांचे सरकार आले आहे. सत्ता असूनही मला यांच्यात नैराश्य, वैफल्य दिसत आहे. पण अशा प्रकारे ज्या घटनेविषयी आपल्याला माहितीच नाही. त्यावर फेकाफेकी करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. लोकांना खरा चेहरा समजला आहे. भाजपा सत्तेसाठी किती आसुसलेला पक्ष आहे? त्यांनी पहाटेचा शपथविधी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते जमले नाही. दोन ते तीन वर्षे त्यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. आज ते आमच्या संपर्कात काँग्रेसचे एवढे लोक आहेत, तेवढे लोक आहेत, असे सांगतात. देवेंद्र फडणवीस यांना मी सभ्य सुसंस्कृत, काळाचे भान असलेले नेते समजत होतो. मात्र मागील चार ते पाच महिन्यांपासून त्यांची लय बिघडत आहे. अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

शरद पवारांनी ठरवलं असतं तर…..त्या काळात मी शरद पवार यांच्या सर्वाधिक संपर्कात होतो. शरद पवारांनी ठरवलं असतं तर पहाटेच्या शपथविधीचे सरकार चालले असते. मुळात शरद पवार यांची लोकशाहीवर श्रद्धा आहे. राज्याचे स्थैर्य त्यांच्या चिंतनाचा विषय असतो. पहाटेच्या शपथविधीचे सत्य कोणाला जाणून घ्यायचे असले? तरी ते इतक्या सहजपणे उलडता येणार नाही. त्याला थोडा वेळ लागेल. पहाटेच्या शपथविधीचे रहस्य आणि सत्य देवेंद्र फडणवीस कधीच सांगू शकणार नाहीत. त्यांना काहीच माहीत नाही. असेही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.