Home स्टोरी पश्चिम आफ्रिकेत केप वर्डे बेटांच्या किनार्‍याजवळ बोट अपघातात ६०हून अधिक प्रवाशांचा मृत्यू!

पश्चिम आफ्रिकेत केप वर्डे बेटांच्या किनार्‍याजवळ बोट अपघातात ६०हून अधिक प्रवाशांचा मृत्यू!

183

१७ ऑगस्ट वार्ता: पश्चिम आफ्रिकेत केप वर्डे बेटांच्या किनार्‍याजवळ सेनेगलमधून स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाल्यामुळे ६० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने बुधवार दि. १६ ऑगस्ट रोजी ही माहिती दिली आहे.

 

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ६३ जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. आतापर्यंत ३८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये १२ ते १६ वयोगटातील चार मुलांचा समावेश आहे. ‘पिरोग’ नावाची लाकडी मासेमारी बोट सोमवारी अटलांटिक महासागरात, सालच्या केप व्हर्डियन बेटापासून सुमारे २७७ किलोमीटर अंतरावर दिसली होती. स्पॅनिश मासेमारी जहाज ज्याने ती बोट पाहिली. त्यानंतर केप वर्डियन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली