Home स्टोरी पळसंब शाळेत क्रिडा साहित्य वाटप…! मंदा जाधव यांचे दातृत्व

पळसंब शाळेत क्रिडा साहित्य वाटप…! मंदा जाधव यांचे दातृत्व

105

मसुरे प्रतिनिधी: पळसंब शाळा नं. १ येथे क्रिडा साहित्य वाटप करण्यात आले.दातृत्व म्हणजेच औदार्य किंवा दानशूरता होय. दाता म्हणजे दुसर्‍याला दान देणारा. “दाता” हा एकच शब्द किती महानता दाखवून देतो. आपण जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला, वस्तू किंवा पैशाच्या रूपाने दान देत असतो तेव्हा ते घेणाऱ्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरील आनंद शब्दात व्यक्त करता येत नसतो असे यावेळी माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर म्हणाले.

पळसंब गावठणवाडी येथील पळसंब शाळा न .१ च्या माजी विध्यार्थीनी श्रीमती मंदा लक्ष्मण जाधव यांनी रोख रक्कम पाच हजार रुपये श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाकडे सुपूर्द केली होती . श्रीमती . मंदा जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्या रक्कमेतून मंडळाने बुद्धीबळ , लगोरी , बास्केट बॉल ,क्रिकेट बॅट , स्टॅम्प , टेनिस बॉल , फुटबॉल , हॉलीबॉल , हॉलीबॉल नेट, रस्सीउडी, सापशिडी असे क्रिडा साहित्य खरेदी करत पळसब शाळेत ते सुपूर्द करण्यात आले.

श्रीमती मंदा जाधव यांचे माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी कौतुक करत शाळेच्या सुख दुःखात प्रत्येक उपक्रमात पळसंब गाव व शाळेचे माजी विद्यार्थी नेहमी उभे राहतीत. फक्त हाक मारा असे मनोगत व्यक्त केले

तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद कदम व सहशिक्षिका सौ योगिता पवार यांनी आभार मानले. श्रीमती .मंदा लक्ष्मण जाधव या श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाचे आजिव सभासद श्री पर्शुराम जाधव यांच्या बहिण आहेत. देवस्थान मानकरी श्री राजन पुजारे जयवंत पुजारे ,शाळा शिक्षण समिती अध्यक्ष श्री. रविकांत सावंत, उपाध्यक्ष श्री रमेश मुणगेकर, मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत, उपाध्यक्ष श्री अमरेश पुजारे, सचिव व माजी सरपंच श्री . चंद्रकांत गोलतकर, श्री. शेखर पुजारे, मनसे शाखा अध्यक्ष रुपेश पुजारे, अनिकेत परब उपस्थित होते.