मसुरे प्रतिनिधी: पळसंब येथीलश्री जयंती देवी मंदिर येथे श्री सत्यनारायण महापूजे निमित्त ९ मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ९ ते १० वा. पंचायतन देवतांवर लघु अभिषेक, दुपारी २ ते ४ वा.श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ४ ते ५ वा. महाआरती, सायं. ६ ते ७ वा. स्थानिक सुस्वर भजने, रात्रौ. ०९.३० वा. पारंपारीक डबलबारी भजन सामना पावणादेवी प्रासादिक भजन मंडळबुवा प्रमोद हर्याण विरुद्धगंभिरेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा लक्ष्मण गुरव या दोन बुवांमध्ये होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळ, पळसंब यांनी केले आहे.
