श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ(रजि) पळसंबचे आयोजन.
मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील पळसंब येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता श्री जयंतीदेवी मंदिर ते पळसंब शाळा महिलांची भव्य रॅली, सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पुजन,
११ वाजता, शालेय मुलांचे विविध कार्यक्रम, १२ वाजता प्रमुख मार्गदर्शकांचे मार्गदर्शन असा कार्यक्रम होणार आहे. तरी शिवप्रेमी, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री जयंती सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांनी केले आहे.