मालवण प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून पळसंब येथे व्यायाम शाळेसाठी ७ लाख रुपये मंजूर झाले असून सदर निधीतुन इमारतीचे बांधकाम होणार आहे. आमदार श्री वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन झाले. देवस्थान मानकरी .श्रीप्रकाश ( अण्णा) कापडी यांच्या हस्ते भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी
विभाग प्रमुख समीर लब्दे, उपविभाग प्रमुख अनिल गांवकर, युवा सेना उपविभाग प्रमुख छोटु पांगे, चेअरमन श्रीकांत बागवे, अरविंद साटम, संदिप तेली, त्रिंबक ग्रामपंचायत सदस्य सागर चव्हाण, देवस्थान मानकरी श्री. अनिल पुजारे , जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री . दादा गावकर देवस्थान अध्यक्ष श्री . रमेश परब उपाध्यक्ष श्री . मधुकर कदम ,राजन पुजारे, बबन पुजारे, तंटा मुक्ती अध्यक्ष सुरेश पुजारे, माजी सरपंच श्री . चंद्रकांत गोलतकर, पळसंब उपसरपंच श्री अविराज परब, ग्रामपंचायत सदस्य श्री अक्षय परब, स्मिता परब, जुवेकर, रुतुजा सावंत, शाखा प्रमुख पिंट्या सावंत, कपील मुणगेकर, मेघशाम जुवेकर, अनिल परब, अमित पुजारे, देऊ सावंत, दिनेश साईल, रतिका गोलतकर, पुनम गोलतकर, वंदना चिंचवलकर, मगेश सावंत, अक्षता परब, जयेद्र परब, मधुकर सावंत उपस्थित होते
यावेळी वैभव वसंत सावंत यांची पळसंब गावाच्या शाखाप्रमुख पदी तर कपिल कृष्णा मुणगेकर यांची युवा सेना शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले.







