धनश्री पुजारे ठरली पैठणीची मानकरी…
श्री जयंतीदेवी सांस्कृतीक कला क्रिडा मंडळाचे आयोजन….
मसुरे प्रतिनिधी:
मालवण तालुक्यातील श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब च्या वतीने नवरात्रौत्सव निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.निकाल पुढील प्रमाणे आहे.
संगीत खुर्ची स्पर्धा– प्रथम तीन क्रमांक -सोनाली परब, ऋत्वी पुजारे, ऋतूजा सावंत.
बकेट मध्ये चेंडू टाकणे प्रथम तीन क्रमांक – मयुरी परब, ऋत्वी पुजारे, वंदना चिचंवलकर.
रांगोळी स्पर्धा प्रथम तीन क्रमांक मंदिरी मुणगेकर, विशाखा परब, तृतीय ऋत्वी पुजारे.
फॅन्सी ड्रेस स्पर्धा- प्रथम तीन क्रमांक वैदेही सावंत, मृग्मयी परब, स्वरा सावंत.
फुगे फुगविणे स्पर्धा- प्रथम तीन क्रमांक राखी परब, निकीता सावंत, काजल सावंत.
हात बांधुन चेंडू गोळा करणे- प्रथम – दक्षता सावंत, द्वितीय – काजल सावंत, तृतीय – प्राजक्ता सावंत.
चुरमुरे वाटाने स्पर्धा- प्रथम – जयश्री परब, द्वितीय – मयुरी परब, तृतीय -विशाखा परब. लिंबु चमचा स्पर्धा- प्रथम – धनश्री पुजारे, द्वितीय – सानीका सावंत, तृतीय – वैदेही सावंत.
तळ्यात मळ्यात स्पर्धा-प्रथम – धनश्री पुजारे, द्वितीय – ऋतुजा सावंत, तृतीय – मंदीरी मुणगेकर.
तसेच सर्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्यासाठी सौ.सोनाली परब, सौ. मयुरी परब, कु. मंदिरी मुणगेकर, कु .वैदेही सावंत, सौ.राखी परब, सौ.दक्षता सावंत, सौ .जयश्री परब, कु.धनश्री पुजारे
यांच्यात डोळ्याला पट्टी बांधुन मढके फोडणे या स्पर्धेत कु .धनश्री पुजारे हिने प्रथम विजयी होत ती पैठणीची मानकरी ठरली.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरुण लाड, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश परब, संजय चव्हाण, दत्ता साटम, चंदकांत तर्फे, दिवाकर पुजारे, संतोष चिंदरकर, राजन पुजारे, प्रमोद सावंत, अनिल परब, तारी, आजिव सदस्य-दिगंबर साटम-परशुराम परब
तसेच मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, सचिव चंद्रकांत गोलतकर, खजिनदार वैभव परब, शेखर पुजारे, अमित पुजारे, अक्षय परब, बबन पुजारे, हितेश सावंत उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण पुजारे यांनी केले. मंडळाच्या वतीने सर्व स्पर्धकांचे अभिनंदन व उपस्थिताचे आभार मानण्यात आले.